तीन दिवसांत चार गावठी पिस्तूल जप्त…

Spread the love

तीन दिवसांत चार गावठी पिस्तूल जप्त…
परभणी स्था.गु.शाखेच्या पथकाची कार्यवाही.
परभणी/ प्रतिनिधी
परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष ‘रिअल सिंघम’ जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी स्विकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांसह गुन्हेगारी प्रवृत्तीचा विमोड करण्याच्या दृष्टीने कठोर पावल उचलण्यास सुरूवात करीत सर्वप्रथम अत्यंत कर्तव्यकठोर कार्यतत्पर व धाडसी अधिकारी व कर्मचाऱ्यांना संघटित करून विशेष पथकाची स्थापना केली.

विशेष पथकातील धाडसी अधिकारी व सहकारी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.मिना यांनी दिलेल्या जवाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडीत जिल्हा पोलिस दलाचे संपूर्ण मराठवाड्यात नावलौकिक केले.अवैध वाळू,तस्करी अवैध गुटखा तस्करी,गांजा तस्करी,शासकीय स्वस्त धान्य तस्करी,अवैध देशी-विदेशी तस्करी,अवैध मटका जुगार अड्यांविरोधात धाडसी कारवाया करीत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याच्या एकामागून एक अनेक धाडसी कारवाया पथकाने यशस्वीपणे पार पाडल्या त्याच प्रमाणे विशेष पथक/स्थागुशाचे धाडसी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार,पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,शंकर गायकवाड,गणेश कोटकर,यशवंत वाघमारे,विष्णू भिसे,अझहर पटेल,दिपक मुदिराज,अरूण कांबळे,सुधीर काळे यांनी दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी परभणी शहरातील साकलाप्लॉट परिसरातून तिघा आरोपींकडून अवैध गांजा अफीससह दोन गावठी पिस्टल जप्त करण्याच्या कारवाईला चोविस तासही उलटत नाही तोच दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील पाथरी शहरातील एकता नगर परिसरातील एका जिममधून पुन्हा एक पिस्टल जप्त करीत आरोपीस ताब्यात घेतले सदरील घटनेला तिन दिवसही होत नाही तोच या स्थागुशाच्या धाडसी पथकाने काल शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी २०२१ रोजी परभणी ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौ.नागापूर परिसरातून सतीश नामदेव कुरवळे याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल जप्त करण्याची धाडसी कारवाई केली यावेळी सदरील आरोपीस पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पिस्टल परभणी शहरातील भिमनगर परिसरात राहणाऱ्या शेख गफ्फार शेख अब्दूल याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले यानंतर शेख गफ्फार शेख अब्दूल याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याने सदरचे पिस्टल शेख सोनु उर्फ अमीर शेख ताहेर राहणार रमाई नगर परभणी याच्याकडून घेतल्याचे समजते या संदर्भात ग्रामीण पोलिस स्थानकात पुढील कारवाई सुरू असून स्थागुशाच्या पथकातील अत्यंत कर्तव्यकठोर व धाडसी सहाय्यक पोलिस अधिक्षक अविनाश कुमार स्थागुशाचे व्यंकटेश आलेवार यांच्या विशेष मार्गदर्शनाने धाडसी कारवाया करणारे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार,पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,शंकर गायकवाड,गणेश कोटकर,यशवंत वाघमारे,विष्णू भिसे,अझहर पटेल,दिपक मुदिराज,अरूण कांबळे,सुधीर काळे यांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात तिन दिवसाच्या कालावधीत तब्बल चार पिस्टल जप्त करण्यात आल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात असून पथकाचे सर्वसामान्य जनतेतून केले कौतुक जात असून या धाडसी कारवायां संदर्भात जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना,अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे…..

You cannot copy content of this page