मुलाचा विवाह समारंभ आटोपून परतणाऱ्या पित्यावर काळाची झडप पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर जवळील अपघातात अन्य सहा जन गंभीर जख्मी
मुलाचा विवाह समारंभ आटोपून परतणाऱ्या पित्यावर काळाची झडप पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर जवळील अपघातात अन्य सहा जन गंभीर जख्मी
पूर्णा/ प्रतिनिधी
तालुक्यातील झिरोफाटा-पुर्णा मार्गावरील कात्नेश्वर जवळ वर्हाडाच्या इन्होवा कारची व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने पुत्राच्या विवाह समारंभाहून परतणाऱ्या पित्यावर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार दि.८ मार्च २०२१ रोजी मध्यरात्री ३;१५ वाजेच्या सुमारास घडली असून या दुर्दैवी घटनेत गंभीर जख्मी झालेल्या गौर येथील किशनराव विठ्ठलराव पारवे वय ६२ वर्षे यांचे नांदेड येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
अधिक माहीतीनुसार सेलु येथून लग्न समारंभ उरकुन गौर येथील वर्हाडमंडळी ईनोव्हा कार एम एच २६एके९७०० कारने झिरोफाट्याकडुन पुर्णेकडे येत होते.यावेळी व पुर्णेकडुन येणारा एक एम एच २२ए.एन १०५७ व ट्रक एम एच १० ए.डबल्लू ८१६१ हे मागे पुढे येत होते पहाटे ३:१५ वाजण्याच्या सुमारास कात्नेवर गावाजवळ आल्यावर ईनोव्हा ला समोरुन येणा-या ट्रक्टर धडकला.त्यापाठोपाठ चालकाने हा अपघात टाळण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रक्टर च्या पाठीमागून येणारा ट्रक ही ईनोव्हावर आदळला.या झालेल्या भिषण अपघातात ईनोव्हा गाडीत बसलेले किशनराव विठ्ठलराव पारवे वय ६२ हे मृत्यू पावले.यावेळी गाडीत असलेले कार चालक कालिदास केशव पारवे (वय २३) कोंडीराम विठ्ठलराव पारवे (वय ६७ ) , सुरेश धोंडीराम पारवे (वय ३८) , धोंडीराम नानाराव पारवे (वय ५५ ), वैजनाथ रामराव पारवे (वय ४५ ), प्रभाकर नारायण पारवे (वय ४० )हे गंभीर जखमी आहे . कारमध्ये एकूण चालकासह सात जण होते.व-हाडासोबत असलेल्या दुसऱ्या वाहनातील नातेवाईक व कात्नेश्लर पोलिस पाटील ज्ञानोबा काटकर यांनी जखमींना गाडी बाहेर काढुन त्यांना दुसऱ्या वाहंनातुन नांदेड येथे उपचारासाठी हलविले.











