अखेर परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले

Spread the love

अखेर परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले

खा. संजय जाधव यांच्या लढ्याला यश


परभणी- मिळणार.. मिळणार…अशा बहुप्रतिक्षेत असलेल्या परभणीला अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले. यामुळे परभणीचे खा. संजय जाधव यांच्या लढ्याला यश मिळाले, अशा प्रतिक्रिया जिल्हाभरातून व्यक्त होत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जे निकष पूर्ण करावे लागतात ते सर्व निकष पूर्ण करूनही परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होत नव्हते. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, म्हणून परभणीचे खा. संजय जाधव यांनी गेल्या उपोषण, साखळी उपोषण, निदर्शने, घेराव, मोर्चा आदी मार्गाने दोन-तीन वर्षांपासून लढा उभारला होता. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.
दरम्यान, राज्यात उस्मानाबाद, रत्नागिरी आदी ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सरकारने घोषणा केली. मात्र सर्व निकष पूर्ण करूनही आणि मोठा लढा उभारून वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा करूनही परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषित होत नव्हते.
त्यामुळे परभणीकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. मात्र आज दिनांक ८ मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली. या घोषणेमुळे परभणीकरांची फार जुनी आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी पूर्ण झाली आहे. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याने खा. संजय जाधव यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले, अशा प्रतिक्रिया जिल्हाभरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. तसेच परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषित झाल्यानंतर परभणी शहर व जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांचे आभारखा. संजय जाधव
परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषित झाल्यानंतर आनंद व्यक्त करीत प्रतिक्रिया देताना खा. संजय जाधव म्हणाले की, अखेर परभणीकरांना न्याय मिळाला आहे. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याने मलाही खूप आनंद झाला. आरोग्याच्या बाबतीत सरकारने गोरगरिबांची सोय केली आहे. तसेच परभणीकरांची अत्यंत जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांपासूनची मोठी मागणी सरकारने पूर्ण केल्याबद्दल मी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे जाहीर आभार मानतो, असेही खा. जाधव म्हणाले.

You cannot copy content of this page