परभणी जिल्ह्यातील कातनेश्वरात घरफोडी; चोरट्यांनी पाऊन किलो चांदीसह सोन्याचा ऐवज लांबवला….
परभणी जिल्ह्यातील कातनेश्वरात घरफोडी; चोरट्यांनी पाऊन किलो चांदीसह सोन्याचा ऐवज लांबवला….
परभणी/प्रतिनिधी ः पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे बुधवारी (दि.10) भल्या पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास झालेल्या घरफोडीत पाऊन किलो चांदीसह सोने व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली.
पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील प्रकाश चापके यांचे घर आहे. बुधवारी पहाटे दोन-अडीचच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या चॅनेलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाक घराचे कुलूप तोडून स्टोअर रूममधील पत्र्याच्या पेटीतील सोन्या-चांदीचे दागीने व नगदी रुपये चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी प्रकाश चापके यांनी पूर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मिलींद खोडवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.पी. चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे, कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
प्रकाश चापके यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, चोरट्यांनी चॅनेलगेट व त्यानंतर स्वयंपाक घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. स्टोअररूमध्ये ठेवलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीतील पाऊन किलोन चांदीचा ऐवज ज्यात चांदीची दोन ताटे, चांदीचे दोन ग्लास, चांदीचे दोन पंचेपाळ चांदीचे करडे असा 750 ग्रॅम वजनाचा ऐवज ज्याची किंमती 45 हजार रुपये होते, तसेच सोन्याचे दीड तोळे दागीने, गळ्यातील आणि तीन अंगठ्या, लहान मुलांचे कानातील कुडके दोन जोड हे 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने, या शिवाय 14 हजार रुपये रोख असा सुमारे 99 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे म्हटले. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे हे करीत आहेत.












