नगरपरिषदेच्या घरकुल घोटाळ्यात एजन्सीची चौकशी होणार काय?
नगरपरिषदेच्या घरकुल घोटाळ्यात एजन्सीची चौकशी होणार काय?
सामाजीक कार्यकर्ते शे इर्फान यांची जिल्हाधिकारी यांना तक्रार
पूर्णा/:- पूर्णा नगर परिषद , कुशाग्र असोसिएट प्रा. लि. नांदेड़ या एजेंसी विरुद्ध सामजिक कार्यकर्ते शेख इरफ़ान शेख बाबू यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब, परभणी यांना तक्रार केली होती
दि. 9/11/2020 रोजी तक्रार मध्ये नमुद केलेले की पूर्णा नगर परिषदने प्रधानमंत्री आवास योजनेचे काम कुशाग्र असोसिएट प्रा. लि. नांदेड़ एजेंसीला देण्यात आले. या एजेंसीने व मुख्याधिकारी यानी 951 मंजूर dpr च्या लाभार्थीना लाभ न देता इतर लोकांच्या खात्या मध्ये गैरकायदेशिरपने निधीचा गैरवापर केला आहे
कारण की ज्या लोकांच्या खात्या मध्ये 40, 000/-रूपये टाकन्यात आले त्यांची नावे 951 डी. पी. आर.(DPR) मध्ये नाही अशी आम्हाला शंका आहे.कारण की त्या यादी मध्ये 951 मंजूर केलेला डी. पी आर.(DPR)मध्ये त्या लोकांचे नाव आहे किंवा नाही हे आपल्याला कळेल. तसेच एजेंसीला लाखो रुपयाचे बिल नियमबाह्य देण्यात आले त्याचीही चौकशी करण्यात यावी. मे. साहेबांनी वरील प्रकरणची चौकाशी करण्यात यावी एजेंसीवर योग्य ती चौकशी करुण कुशाग्र असोसिएट प्रा. लि. नांदेड़ची चौकशी करावी व दोषी आढळल्यास त्याचा वर योग्य ती कार्यवाही करावी. व एजेंसीचे लायसंस रद्द करावे.
असे तक्रार मध्ये नमुद आहे तक्रारदार यांनी स्वता मा जिल्हाधिकारी साहेबाना भेटून सर्व सवितर माहिती सांगितली. मा जिल्हाधिकारी साहेबांनी शेख इरफ़ान यांच्या तक्रारांची दखल घेऊन मा उपविभागीय अधिकारी गंगाखेड़ यांना चौकशी साठी दि 19/11/2020 रोजी आदेश दिले त्या नंतर उपविभागीय अधिकारी गंगाखेड़ साहेब यांचे पत्र तक्रारदारस दि 1/12/2020 रोजी आले
त्या नंतर पहेली बैठक तहसील कार्यालय मध्ये दि 23/12/2020 ठेवण्यात अली त्या मध्ये तक्रारदारने सर्व कागदपात्रे दाखल केले व इतर नागरिकांचे तक्रार पण दखल केले त्या नंतर एजेंसी ला व न. प पूर्णा ला खुलासा करण्या साठी दि 27/1/2021 रोजी देण्यात अली होती त्या रोजी एजेंसी ने खोटा dpr 951 नांदेड़ मध्ये तयार करुण त्या खोट्या dpr वर os नंदू चावरे, इंजिनियर संजय दिपके यांच्या स्वाक्षरिया घेऊन 27/1/2021 रोजी दाखल केला दिशा गुल करण्या साठी
त्या नंतर तक्रारदारस खुलासा करण्यासाठी दि 10/2/2021 देण्यात अली त्या मध्ये तक्रारदारने सर्व पुरावे व 2018 मध्ये जे dpr मंजूर झालं होत त्या मधील लाभार्थीचे ऑनलाइन बेनेफिशरी स्टेटस प्रिंट देऊन असे सांगितले की ज्या एजेंसी ने दखल केलेले 951 चा dpr खोटा आहे त्या मध्ये या लाभार्थी चे नाव का नाही कारण की ते एजेंसी ने दाखल केलेले 951 dpr हा खोटा आहे कारण की 2018 मध्ये जे 951 च्या dpr मंजूर करण्यात अला होता त्या मध्ये या लाभार्थीचे नावे आहे आणि जे 951 चा dpr मंजूर झाला होता त्या वर तत्कालीन मुख्याधिकारी हेमंत केरुळकर, नगर अभियंता, जूनियर इंजिनियर यांच्या स्वाक्षरी असला पाहिजे तसेच म्हाडा कार्यालय मुम्बई च्या सही व शीक्का असल्या पाहिजे ते नाही असे तक्रार दाराणे खुलासा केला व सर्व पुरावे दिले दि 10/2/2021 पासून एक महीना झाला न. प पूर्णा व एजेंसी खुलासा केलेले नाही
त्याना 3/3/2021 रोजी खुलासा करण्या साठी देण्यात आले होते मात्र एजेंसीचे कर्मचारी ची तबियत खराब आहे असे खोटे सांगून तारीख वाडून मागितले.
तर त्याना पुढील 17/3/2021 देण्यात अली तरी एक महीना झाला मात्र एजेंसी ने व नगर पालिका ने खुलासा केला नाही जानून बुजुन काय पण खोटे सांगून तारीख वाडून घेत आहे मात्र मा उपविभागीय अधिकारी साहेबा कडून जशी तपासनी कऱ्याची तसी तपासनी होत नाही तक्रारदारचे म्हणे आहे की खऱ्या पद्धततिने तपासनी करायला पाहिजे अशी मागणी तक्रारदार यांची आहे.















