वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश मिळविल्याबद्दल परळीतील दोन विद्यार्थ्यांचा प्रा.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- दि.4 सप्टेंबर 2024 रोजी परळीतील सामाजिक कार्यकर्ते प्रा.विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळविल्याबद्दल दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री विलास आदोड यांची मुलगी कु.अनिशा हिने एस.सी. कॅटेगिरी मधून मेडिकल साठी प्रवेश मिळवित तिने या परीक्षेत 572 गुण घेतले असून तिला एस.आर.टी.मेडिकल कॉलेज अंबाजोगाई येथे प्रवेश मिळविला आहे. तर श्रीमती कृष्णाबाई देशमुख शाळेतील शिक्षक श्री अमोल भानुदास गुढे सर यांच्या रितेश अमोल गुढे या मुलाने ओपन मधूनच मेडिकलला प्रवेश मिळविला आहे. त्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
श्री माणिकभाऊ मुंडे यांच्या हस्ते त्याचाही सत्कार करण्यात आला. तर कु.अनिशाचा सौ.आशा विजयकुमार देशमुख यांनी सत्कार केला. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात श्री रेपे साहेब, श्री. जे.टी.महाजन सर, श्री विलासराव आदोडे, श्री आटोळकर, श्री प्रकाश शिंदे श्री अशोक शिंदे, श्री महादेव हुंडेकर श्री आर.एम.कांबळे, श्री राहुल जगतकर, श्री राहुल ताटे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page