उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षांमुळे पूर्णा तालुक्यात दारुचा महापुर..!

Spread the love

अवैध दारु विक्रीवर पोलीसांची कारवाई;दारुबंदी विभागाची कार्यवाही फक्त उदिष्टपुर्तीसाठीच..?

पूर्णा/प्रतिनिधी
उत्पादन शुल्क विभागासह स्थानिक प्रशासनाच्या आर्शिवादाने शहरासह पुर्णा तालुक्यातील अनेक गावात अवैध दारु विक्रेत्यांनी दारुचा महापुर आणला असुन,जागोजागी दारूची अवैध विक्री खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे.स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱी कार्यवाही करुन मोकळे होत आहेत, मात्र तालुक्यात कार्यरत असलेले दारुबंदी निरीक्षक, बीट जमादार हा सर्व प्रकार उघड्या डोळयांनी पाहत आहेत. त्यांच्या कडून केवळ उद्दीष्ट पुर्तीसाठी नाममात्र कारवाई केली जात असल्याने त्यांच्याकडूनच अवैध विक्रीला पाठबळ तर मिळत नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
पुर्णा तालुक्यात मागील काही वर्षात अवैध दारू विक्रीचे प्रमाणात मोठी वाढ झाली असुन, अनेकजण या दारूच्या नादी लागून आपले आयुष्य बरबाद करून घेत आहेत तर सर्वात गंभीर बाब म्हणजे शालेय विद्यार्थीही दारूच्या नादी लागल्याचे ऐकावयास मिळाले आहे.शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची दुकाने थाटल्याची दिसत आहे.अवैध दारूला लगाम लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी असमर्थ ठरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे अवैधदारु विक्रेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध तर नाहीत ना असा संशय व्यक्त होत आहे.संबधीत विभागाचे अधिकारी कर्मचारी पूर्णा तालुक्यात सवडीनुसार भेटी देवून वर्षभरात उदिष्टपुर्तीचे टारगेट पुर्ण करण्यासाठी थातुरमातुर कार्यवाही करतात. अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी कुठलीच कडक भूमिका घेत नसल्याने जागरुक नागरिकांकडून संबंधित विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे.
पूर्णा शहर व तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी शासनमान्य बार, परवानाधारक दारु विकेत्यांची दुकाने आसतानाही अवैधरित्या देशी आणि विदेशी दारुची खुलेआम विक्री केल्या जात आहे.ड्राय डेच्या दिवशीतर तालुक्यात अनेक ठिकाणी जत्रेचे स्वरूप येते.खुलेआम उघड्यावरच दारूच्या बाटल्या जादा दराने दारूची विक्री करत आसल्याचे अनेक गावातील चित्र आहे, बंद च्या दिवशी अनेकदा स्थानिक पोलिस प्रशासनास अवैध दारु विक्रेत्यांवर कार्यवाही करते परंतु कार्यवाही नंतर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई होते .त्यामुळे या सर्व गोष्टींचा काहीच उपयोग होत नाही.कायद्याची पायमल्ली करीत खुलेआम अवैध दारू विकणा-यांवर कुणाचा वरदहस्त आहे.असा सवाल आता उपस्थित होत आहे.स्थानिक दारुबंदी अधीकारी कार्यवाही करत नसल्याने आता उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील अवैध दारु विक्रीला लगाम घालण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.

———————————
दारुबंदी विभाग वरिष्ठांच्या भुमिकेकडे लक्ष..
सबंध तालुका अवैध दारूच्या विळख्यात सापडल्याचे चित्र…
पूर्णा तालुक्यातील जवळपास सर्वच गावात अवैध दारुचा महापुर आलेला आहे. काही स्थानिक पोलीस कारवाई करतात मग उत्पादन शुल्क अधिका-यांकडून कार्यवाही होत नसल्याने जणू या धंद्याला त्यांनी पाठींबा दिला की काय.? असा समज येथील सर्वसामान्यांना पडत आहे. अनेक रस्त्यावर आसलेल्या ढाबे, हॉटेलवरूनही अवैध रित्या दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम चालतो आहे. यामुळे ग्रामस्थांना दारू विक्रीचा व तळीरामचा त्रास सहन करावा लागत आहे.संबंधीत विभागाकडे तक्रारी होताच नाममात्र कार्यवाहीचा देखावा केला जातो मात्र ठोस कार्यवाही होत नाही त्यामुळे वरीष्ठानीच या अवैध धंद्याकडे लक्ष देवुन ते कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केली जात आहे.

You cannot copy content of this page