गंगाखेड मतदार संघासाठी मनसेकडून रुपेश सोनटक्के यांना उमेदवारी.!

Spread the love

मुंबईत अमित ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म

पूर्णा/ प्रतिनिधी
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२४ गंगाखेड मतदार संघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा करत जिल्हा प्रमुख रुपेश भैय्या सोनटक्के यांना उमेदवारी देऊ केली आहे. मुंबई पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते एबीपी प्रदान करण्यात आला.
शिवसेना फुटी नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेले पुर्णेचे मा. नगरसेवक रुपेश सोनटक्के यांनी पक्ष स्थापनेपासून पक्ष वाढीसाठी काम केले आहे. पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी परभणी पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ पाथरी जिंतूर आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवली. पक्षाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ व २०१९ च्या गंगाखेड विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उभा टाकलेल्या उमेदवारांना चांगल्यापैकी मते मिळाली होती.सोनटक्के हे पक्षाप्रती एकनिष्ठ असल्याने त्यांना निष्ठेचे फळ मिळाले असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यांना यावर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड मतदार संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये पक्षाचे नेते अमितजी ठाकरे यांनी रुपेश सोनटक्के यांना एबी फॉर्म देऊन केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रुपेश सोनटक्के यांना उमेदवारी दिल्यानंतर मतदार संघामध्ये आता विद्यमान आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम वंचित चे उमेदवार सितारामजी घनदाट अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

You cannot copy content of this page