अमित शहांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा -मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

Spread the love

मानवत(प्रतिनिधी)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत राज्य सभेत केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांनी जाहीर माफी मागुन, आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मानवत तालुक्यातील
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.सोमवारी २३ रोजी देशाच्या मा.राष्ट्रपतींना मानवत तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
राज्यसभेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत गृहमंत्री अमित शहा यांनी अवमानकारक भाष्य केल्यामुळे देशभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे शहा यांचे वक्तव्य घटनाबाह्य असून,देश हा संविधानावर चालतो.देशात लोकशाही व धर्मनिरपेक्षता हि संविधानामुळे अबाधित आहे संविधान हे भारतीय लोकांना अर्पण आहे.त्यामुळे त्या संविधानावर व त्या संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व देशातील धर्मनिरपेक्ष जनता कधीच सहन करणार नाही म्हणून केंद्रीय गृहमंत्री यांनी माफी मागुन गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रपती महोदयांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
नायब तहसीलदार धारासुरकर यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनावर कॉ रामराजे महाडिक, कॉ रामकृष्ण शेरे, पाटील कॉ अशोक बुरखुडें, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल जाधव ,कॉ लिंबाजी धनले, कॉ अशोक कदम, कॉ देविदास शिंदे, कॉ डिगाबर गिरी,मुंजा जी सोनटक्के,लक्ष्मणराव भिसे, सखाराम जाधव, नाथा तुपसमुद्रे, मारोती जाधव, दिपक ठेंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

You cannot copy content of this page