रेल्वेरुळावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Spread the love

पूर्णा-नांदेड लोहमार्गावरील घटना;धावत्या रेल्वेतून पडुन मृत्यू झाल्याचा अंदाज;पोलीसांत अकस्मात मृत्यू नोंद

पूर्णा/ प्रतिनिधी

नांदेड कडे जाणाऱ्या लोहमार्गावर एका ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवार (ता.७) रोजी उघडकीस आली असून, सदरील तरुण हा कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडुन मयत झाला असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी पुर्णा पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

       पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह परिसरातून पूर्णा ते नांदेड लोहमार्गावरील मैल किमी अंतर १२१/२१ व २२च्या दरम्यान एका अनोळखी ३० वर्षीय  तरुण कोणत्या तरी धावत्या रेल्वेतून पडुन मयत झाला असल्याची खबर सोमवारी सकाळी पुर्णा पोलिसांना पुर्णा रेल्वे स्टेशन मास्तरांनी दिली.घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलीस ठाण्याचे फौजदार श्रीनिवास पडलवार, पो.हे.काॅ.आनंद सोनकांबळे,पोहेकाॅ.एकनाथ आळसे,पो.शि.चंद्रकांत पुदलवाड, रेसुबालाचे शिवकुमार आदींनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करत उत्तरीय तपासणी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.सदरील मयताचे अंगावर गुलाबी लालसर रंगाचा चौकडा शर्ट, सडपातळ बांधा,उंची साडेपाच फुट वर्ण गव्हाळ , डोक्याला कमी असलेला , छातीवर गोंदलेले असे त्याचे वर्णन आहे.सदरील तरुणाची ओळख ज्यपटवण्याची कारवाई सुरू केली असून,घटशेचा तपास पुर्णा पोलीस करत आहेत.सदरील वर्णनाच्या तरुणाबाबात कोणास काही माहिती असल्यास पुर्णा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन फौजदार श्रीनिवास पडलवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page