रेल्वे स्थानकावर आढळला ३० वर्षीय ईसमाचा मृतदेह

Spread the love

पूर्णा रेल्वे स्थानकावरील घटना; लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पूर्णा(प्रतिनिधी)

येथील रेल्वे स्थानकावर एका ३० वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आला आहे.या प्रकरणी पूर्णा लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,पूर्णा रेल्वे स्थानकावरील नांदेड कडे जाणा-या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील लोहमार्गावर रविवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी एक ३० वर्षीय अनोळखी ईसम ज्याचा मजबूत बांधा,१६७ सेमी.उंची,गोरा वर्ण ,चेहरा गोल रेल्वेचा मार लागल्याने फाटलेल्या अवस्थेत तील मृतदेह आढळून आल्याचे काही प्रवाशांनी पाहीले.घटनेची माहिती प्रवाशांनी रेल्वे स्टेशन मास्तर यांना कळवली. स्टेशन मास्तरांनी याबाबत लोहमार्ग पोलीसांना घटनास्थळी बोलावून घेतले. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सपोनि पांचाळ,पोहेकाॅ.सिराज पठाण,पोकाॅ.अविनाश डावरे, होमगार्ड प्रकाश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.लोहमार्ग पोलिसांनी सदरील मृतदेह पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा केला असता.सदरील व्यक्ती ही कोणत्यातरी अज्ञात रेल्वेच्या धडकेत मरण पावली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याने पोलीसांनी मृतदेहाचे स्केच जारी केले असुन पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे.याप्रकरणी पूर्णा लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र.१२२/२४ कलम १०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सपोनि पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ.सिराज पठाण,पोकाॅ.अविनाश डावरे हे करत आहेत.

You cannot copy content of this page