पूर्णा तालुक्यातील ८१९ विद्यार्थ्यांनी दिली एन. एम.एम.एस परिक्षा

Spread the love

आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत

पुर्णा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इयत्ता ८ वीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक तब्बल ८१९ विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती योजना परीक्षा दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने दि.२२ डिसेंबर रोजी पूर्णा शहरातील विद्या प्रसारणी सभेचे हायस्कूल व अभिनव हायस्कूल पूर्णा येथे ३५ हाॅल मध्ये एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेच्या पहिल्या दिवशी पुर्णा तालुका गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाप्रमाणे सर्व पर्यवेक्षक शिक्षक यांची सभा घेऊन सर्वांना परीक्षेबाबत सूक्ष्म सूचना देण्यात आले. सदर परीक्षेसाठी पुर्णा तालुक्यातून ८२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ८१९ विद्यार्थीनी परीक्षेत सहभागी झाले होते.. उपस्थित विद्यार्थी शेकडा प्रमाण ९९.३९ टक्के होते. एकूण ३५ हॉलमध्ये ३५ पर्यवेक्षका मार्फत परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेसाठी केंद्र संचालक म्हणून रमेश सूर्यवंशी व भगवान ढोणे सर यांनी काम पाहिले .सदर परीक्षेसाठी गटशिक्षणाधिकारी यांनी भेट देऊन परीक्षा केंद्रावर पहाणी केली. सदर परीक्षेसाठी व्यंकटरमण जाधव, अशोक खिल्लारे संजय कांबळे सय्यद सर व संदेश भरणे यांनी मोलाचे सहकार्य केले. पर्यवेक्षक म्हणून विद्याप्रसारणी सभेचे हायस्कूल व अभिनव हायस्कूल येथील शिक्षकांनी उत्तम रित्या पर्यवेक्षणाचे कामकाज पार पाडले. एकंदरीत परीक्षा शांततेत पार पडली.

You cannot copy content of this page