डॉ.पवन चांडक यांना अरुणोदय प्रतिष्ठानचा स्मृती पुरस्कार जाहीर
परभणी: अरुणोदय प्रतिष्ठाण पुणे व डॉ. दौलतराव लहाने मित्र मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्मृती पुरस्कार येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज सत्यनारायण चांडक यांना जाहीर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी (ता. २५) समर्थनगर येथील आयएमए हॉल येथे होणाऱ्या गौरव सोहळ्यात चांडक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आरोग्य व सामाजिक कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून डॉ. चांडक व डॉ आशा चांडक हे दाम्पत्य सन २०१० पासून एचआयव्ही ग्रस्त व अनाथ मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन, स्वयंरोजगार या क्षेत्रात काम करीत आहेत. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा, समुपदेशन, एचआयव्ही ग्रस्त जोडप्याचा सामूहिक विवाह, निराधार विधवा ताईला उदरनिर्वाहचे साधनेस एकल पालक व अनाथ बालकांचे शैक्षणिक पालकत्व, मोबाईल व्यसनमुक्ती, वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अनेक उपक्रम या दांपत्याकडून राबवले जातात. याची दखल घेऊन संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.