ताडकळस येथे महावितरणच्या लाईनमेनला बदडले
शासकीय कामात अडथळा प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
पूर्णा(प्रतिनिधी)
केबलचे काम करवून घेत असलेल्या महावितरण कंपनीच्या एका लाईनमेनला दोघांनी आमच्या घरची लाईन जोडून दे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे सोमवारी ३० रोजी सायं ५;३० वाजेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात लाईनमेनने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा महावितरण उप विभागीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ताडकळस मंडळातील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमेन) भानुदास अशोक शिंदे (वय ३३)रा.ताडकळस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी ३० डिसेंबर रोजी रोजी सकाळपासून कंत्राटी कर्मचारी दत्ता अंबोरे व काट्रक्टर प्रतिनिधी रहीमभाइ मोमीन यांना सोबत घेऊन ताडकळस येथे ए.बी केबल चे काम सुरू केले होते. गावात काम सुरू असताना सायं काम पूर्ण करुन सरपंचांच्या घरासमोरील परिसरात गल्लीतील लोकांचा विजपुरवठा सुरळीत चालू आहे का तसेच आडी अडचणी साठी थांबले होते.दरम्यान बबलू बबनराव माने,गजानन नामदेव माने हे दोघे शिंदे यांच्या जवळ येऊन बबलू माने, गजानन माने यांनी गजानन माने यांचा घरची लाइट जोडुन दया असे म्हणाले तेव्हा मी त्यांना म्हणलो की, तुमच्या घरचा लाईट कनेक्शन थकबाकी मुळे कायम स्वोरूपीत खंडीत असल्यामुळे मला जोडता येत नाही. तुम्ही थकबाकी भरणा करा तुमची विज सुरळीत चालू होईल.पण त्यांने काहीही ऐकून न घेता लाइटचे कनेक्शन का जोडून देत नाही असे म्हणुन शिवीगाळ करून थापड बुक्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी कंत्राटी कर्मचारी दत्ता अंबोरे व का काॅन्ट्रक्टर प्रतिनिधी रहीमभाई मोमीन यांनी भांडण सोडवा सोड केली यानंतर परत जाताना मला बबलू माने म्हणाला की तु आमच्या गल्लीत पुन्हा दिसलात तर तुला खतम करून टाकतो असी धमकी देत शिवीगाळ करून शासकीय कामात आडथळा निर्माण केला अशी फिर्याद दाखल केली आहे.यावरुन ताडकळस पोलिस ठाण्यात बबलू माने , गजानन माने यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून,तपास जमादार नागनाथ पोते हे करत आहेत.