विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी-प्राचार्य डॉ.के राजकुमार
पूर्णा;श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी संकल्प
पूर्णा(प्रतिनिधी)
ग्रंथ हेच गुरु मानून विद्यार्थ्यांनी विविध विषयावरची पुस्तके वाचावीच तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल तथा इतर गॅझेट मध्ये अडकून न पडता पुस्तकाशी मैत्री करावी असे आवाहन डॉ.के राजकुमार यांनी केले.
पूर्णा येथील श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात १ ते १५ जानेवारी या कालावधील वाचन संकल्प २ महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्यानुसार आयोजित वाचन संकल्प अभियान राबविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. राजकुमार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांनी केले.उपप्राचार्य शिवसांब कापसे व डॉ.गजानन कुरुंदकर,डॉ. संजय दळवी,डॉ.राख रवींद्र,डॉ.संतोषचांडोळे, डॉ.रवी बरडे,डॉ.बालासाहेब मुसळे, डॉ.अजय कुन्हे, डॉ.पुल्ले जितेंद्र यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना प्राचार्य राजकुमार म्हणाले की,शासनाच्या या उपक्रमांतर्गत परिसरातील लेखकांना आमंत्रीत करून विद्यार्थी,वाचक व लेखक यांच्यात संवाद साधला जाईल. त्याचबरोबर कथा,पुस्तक परिक्षण,निबंध लेखन,काव्य वाचन या माध्यमातून विद्यार्थ्यांत वाचन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागा तील डॉ. राजीव यशवंते यांनी केले तर आभार डॉ.गजानन कुरुंदकर यांनी मानले.












