परभणी हादरले;शेत आखाड्यावर दरोडा, महीलेवर सामुहिक अत्याचार,पतीवर कु-हाडीने वार,सासुलाही मारहाण
तालुक्यातील पारवा शिवारातील घटना;घटनास्थळी आय.जी उमाप दाखल; जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू एकाची प्रकृती चिंताजनक
परभणी(प्रतिनिधी)
परभणी पासून जवळच असलेल्या पारवा-जांब रस्त्यावरील पारवा शिवारातील एका शेत आखाड्यावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा घालत अमानुष कृत्य केले आहे.घटनेत आखाड्यावर राहणाऱ्या कुटुंबीयांजवळील ४ तोळे सोन्याचे दागिने २० हजारांची रोकड लुटत एका ४५ वर्षीय महीलेवर सामुहिक अत्याचार करत तीच्या पतीवर कु-हाडीने सपासप वार करत वयोवृद्ध सासुलाही मारहाण केल्याची काळीज हादरविणारी घटना गुरुवारी २ जानेवारी रोजी मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आली आहे.,घटनेची माहिती मिळताच नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप घटनास्थळासह, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पिडीतांची भेट घेऊन विचारपूस केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पोटाची खळगी भरण्यासाठी जिंतूर तालुक्यातील एक शेतमजूर कुटुंब मागील काही वर्षांपासून परभणी जवळ असलेल्या पारवा शिवारातील एका शेतकऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबीयांच्या आखाड्यावर गुरुवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी हल्लाबोल केला.यावेळी दरोडेखोरांनी महिलेच्या पतीवर कुन्हाडीने वार करुन जखमी करण्यात आले. सासुलाही मारहाण करण्यात आली. महिलेजवळील दागिने लुटून तिला आखाड्याबाहेरील खोलीत आणण्यात आले. या ठिकाणी दरोडेखोरांनी महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.तसेच यावेळी दरोड्यात जवळपास ४ तोळे सोने,२० तोळे चांदीचे दागिने लंपास केले आहेत.ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
जखमींना परभणीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती कळाल्यानंतर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, नानलपेठचे पोनि, चितांबर कामठेवाड, पोनि. श्रीकांत डोंगरे, स्थागुशाचे प्रभारी पोनि. विवेकानंद पाटील, सपोनि. तुशांत किनगे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. दरोड्यातील गंभीर जखमी परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर पिडित महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद झालेला नव्हता. दरम्यान सायंकाळी उशीरा विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जखमींची भेट घेतली.