डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी,स्व प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

शहरातील लोक कल्याण नागरी पतसंस्था व मराठवाडा युवक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.६ ते ८) जाने दरम्यान डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्णा येथील मराठवाडा युवक विकास मंडळ व लोककल्याण नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मागील २४ वर्षापासून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व स्व. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी येथील अभिनव विद्या विहार प्रशालेत सोमवार दि.(दि.६) जानेवारी रोजी सौ.डॉ. योगिताताई तौर(होके पाटील) यांचे सती न गेलेली सती-पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंगळवारी(दि.७) रोजी भरत अमदापुरे भारतीय संविधानाची मूलभूत संरचना बुधवार (दि.८) जानेवारी रोजी प्रा.दिपक कासराळीकर यांचे पसायदान आधुनिक संदर्भ या विषयावर व्याख्यानाचे आयोजित करण्यात आलेले आहे.सदरील व्याख्यान हे सायं.६;३० वाजता सुरू होणार आहे.या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.पूर्णा शहर व परिसरातील नागरिकांनी या तीन दिवसीय व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page