प्रवाशी ॳॅटो व मालवाहू अँटोची धडक एकाचा मृत्यू

Spread the love

पूर्णा शहरातील घटना;अन्य जखमीस नांदेडला हलवले

पूर्णा(प्रतिनिधी):

दोन ऑटोची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन घडलेल्या अपघाताच्या घटनेत अँटोमधील एका ४५ वर्षीय ईसमाचा मृत्यू झाला आहे. तर एक ६० वर्षीय वयोवृद्धास ईसम गंभीर जखमी झाला आहे.सदरील घटना शुक्रवारी १० रोजी दुपारच्या वेळी शहरातील बसस्टँड जवळील टीपाईन्ट जवळ घडली आहे.जखमीस पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.
    मयत मोहम्मद शाकीर मोहम्मद मुनीर (वय ४५ वर्ष) मुळ रा.तडीयापूर आझमगड युपी येथील व ह.मु. रिल्याबल कंपनी पूर्णा तर मोहम्मद कलाम वय (६० वर्ष) असं त्या जखमी असलेल्या वयोवृद्ध ईसमाचे नांव आहे. दोघेही येथिल रिलायबल अँग्लो फुड  कंपनीत कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.ता.१० जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास दोघेही शुक्रवारची नमाज पठण करुन दोघेही अॅटो क्र एम.एच.२६/के/१३५३ या मधुन आपल्या  कंपनीजवळ असलेल्या निवासस्थानी जात असताना शहरातील बसस्थानक जवळील रोडवर टि पॉईंट कॉर्नरकडून आलेल्या पिवळ्या रंगाचा पॅजो अँटो क्र.एम.एच २६/ए/ डी/८९१४ एकमेका समोरुन ये-जा पॅजो अँटोचा ट्राॅलीच्या उजव्या बाजूला असलेले सुरक्षा एंगल रिअर अॅटोला जोरदार धडक झाली.या अपघातात छोट्या ऑटोतील प्रवासी मयत मोहम्मद शाकीर मोहम्मद मुनीर व मोहम्मद कलाम हे दोघे गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.येथिल वैद्यकीय अधिका-यांनी दोघांवर तातडीने उपचार सुरू केले त्यापैकी मोहम्मद शाकीर हे मयत झाल्याचे ठार झाला तर दुसरे गंभीर जखमी वयोवृद्ध मोहम्मद कलाम यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तसेच क्षती ग्रस्त वाहन ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.याप्रक्रणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते.

You cannot copy content of this page