दोन वाहनधारकांत नंबर वरुन जुंपली;जिप मालकावर कत्तीने वार
जखमींवर नांदेड येथे उपचार सुरू;चुडावा पोलीसांत घटनेची नोंद
पुर्णा(प्रतिनिधी)
प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी खाजगी वाहन पाॅईन्टवर नंबर लाऊन उभारलेल्या एका ५८ वर्षीय खाजगी जीप मालक व अचानक येऊन प्रवाशी घेऊन जाणा-या एका अँटो चालकात नंबरवर असताना प्रवाशी कसे काय घेऊन जातो असं म्हटल्याचा राग मनात धरून जीप मालकांस कत्तीने डोक्यात मारुन प्राणघातक हल्ला केला असल्याची घटना पांगरा ढोणे शनिवारी ता. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली असून,गंभीर जखमी झालेल्या जिपमालकास नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
नानाराव भिवाजी कापूरे (वय ५८)वर्ष रा.पांगरा ढोणे ता.पूर्णा जि.परभणी असं त्या जखमी झालेल्या खाजगी जीपमालकाचे नांव आहे.तालुक्यातील पांगरा, पिंपळा, वाई,मरसुळ,लोण ही गावे भाजीपाला,फळ उत्पादक शेतकऱ्यांची गाव असल्याची ओळख आहे.अनेक शेतकरी खाजगी वाहनाने दैनंदिन भाजीपाला फळ विक्रीसाठी पूर्णा शहराकडे जात असतात.या गावा प्रमाणे पांगरा ढोणे येथेही खाजगी वाहन चालक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना आपल्या वाहनातून ने- आण करत असतात .शनिवारी दुपारच्या समयी नानाराव कापुरे हे पाईन्टवर आपले वाहन भरण्यासाठी नंबर लाऊन उभे होते.दरम्यान गावातील खाजगी अँटो चालक लखन प्रकाश कापुरे याने नंबरला न थांबता सरळ आपल्या वाहनातून काही प्रवाशांना घेऊन गेले.याचा जाब नाना कापुरे यांनी त्यास विचारला असता ऑटो चालक लखन प्रकाश कापूरे याने चिडून जात नानाराव कापूरे यांच्या डोक्यात व शरीरावर कत्तीने वार करुन जिवघेणा प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले.त्यानंतर जखमीस नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सदर घटनेची माहिती चुडावा पोलीसांना कळवली आहे.दरम्यान,जखमी व्यक्तीचा दवाखान्यात जवाब घेतल्यानंतर प्राणघातक हल्ला करणा-या सदर ऑटो चालका विरुद्ध गुन्हा दाखल होईल.असे चुडावा येथील पोलिस सुत्राकडून सांगण्यात आले.सध्या जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.