डिवायएसपींच्या पथकाची छापेमारी; जेसीबी,किनीयंत्र व ट्रॅक्टर असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

पूर्णा पोलीसांत वाहनांच्या चालक मालकांवर गुन्हा दाखल..

पूर्णा(प्रतिनिधी)

पूर्णा पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या नांदगाव शिवारातील पुर्णा नदी पात्रात,डिवायएसपी डॉ.समाधान पाटील यांच्या पथकाने सोमवारी ता.३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अवैध रित्या विनापरवाना वाळू उपसा करत असताना छापेमारी करून वाळू उपसा करण्यासाठी वापरात येणारे एक केनी यंत्र त्यास जोडलेले एका ट्रॅक्टरसह जेसीपी पकडले असुन  पोलीसांनी  घटनास्थळावरून ५ ब्रास वाळूसह तब्बल २३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी पूर्णा पोलीसांत सदरील वाहन चालक व मालकांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       जिल्ह्यात महसूल विभागाकडून कोणत्याही नदीपात्रातील वाळू घाटांचा लिलाव केला नसताना अनेक वाळू माफिया ना-ना त-हेच्या शकला लढवत अवैध रित्या वाळू उपसा करत आहेत.मात्र यावर महसूल विभागासह पोलिस विभागही करडी नजर ठेवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

      पूर्णा पोलिस उपविभागा अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील  डिवायएसपी डॉ.समाधान पाटील हे वाळू माफियांचे कर्दनकाळ ठरु लागले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष पथक तयार करुन पथकानेही एकापाठोपाठ कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे.रविवारी डिवायएसपी डॉ.समाधान पाटील यांना नांदगाव शिवारात अवैधरित्या जेसीबी व किनीयंत्रांच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची कुणकुण लागली होती.त्यांनी पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या आपल्या पथका तातडीने घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले.यावेळी फौजदार सुरजीत सिंह माळी,पो.शि.भानुदास राठोड, पोशि.संदिप चौरे,चापोशि शेंबेवाड पोशि.चव्हाण यांचे पथक नांदगाव शिवारातील पूर्णा नदी पात्रात धडकले. यावेळी पथकाने एक पिवळ्या रंगाची 3DX कंपनीची जेसीपी ( एम.एच.४० /सि.एच/३४६३) व किडनी यंत्र जोडलेले पिवळ्या रंगाचे ट्रॅक्टर (एम.एच/२२/ए.डब्ल्यु/ ६०५८) हे बेकायदेशिरित्या वाळुचा उपसा करून चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने नदिपात्रातुन वाळु काढताना दिसुन आले.घटनास्थळी  पोलीसांना पाहुन वाहने जागीच सोडून वाहनांचे चालक व मालक पळुन गेले.यानंतर पोलीस पथकाने जेसीबी,किनीयंत्र जोडलेले ट्रॅक्टर सह नदीपात्रातून उपसा केलेली५ ब्रास रेती असा सुमारे २३ लाख १५ हजारांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन पूर्णा पोलिस ठाण्यात जमा केला आहे.पो.शि. राठोड यांच्या फिर्यादीवरून सदरील जेसीबी व ट्रॅक्टर चालक यांच्या वर भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५)  सहकलम ४८ (७) (८) गौण खनिज कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोउपनिरीक्षक पडलवार यांच्या कडे सोपवण्यात आला आहे.

You cannot copy content of this page