रामराव कुशेजी पारवे यांचे निधन !

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

रामराव कुशेजी पारवे यांचे दि.14/03/2025 वार-शुक्रवार रोजी रात्री 10:20 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 102 वर्ष होते.ते श्री सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे 40 वर्षांपासून अध्यक्ष आहेत.तसेच श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक आहेत.त्यांनी उभी हयातभर समाजाचे कार्य केले.ते समाजातील वाद-विवाद मिटविण्यासाठी नेहमी निपक्षपणे कार्यरत असायचे.त्यांनी आयुष्यभर समाजचे देणें म्हणून आनंदाने कार्य केले.ईशवरभक्तीत त्यांनी पूर्ण आयुष्य घालवले व तसेच गौर पंचक्रोशीत वारकरी संप्रदाय रुजविण्याचे कार्य केले.त्यांच्या पश्चात एक भाऊ,दोन मुले, एक मुलगी ,नातू,पणतू असा परिवार आहे.केशवराव पारवे यांचे थोरले बंधू होत.लोकमतचे वार्ताहर व सेवानिवृत्त कारकून नवनाथ पारवे व शिक्षक वैजनाथ पारवे (बापूराव सर) यांचे ते वडील होत.

You cannot copy content of this page