श्री गुरुबुद्धिस्वामी मठ संस्थान यात्रा महोत्सवाची तयारी;नुतन कार्यकारणी गठीत

Spread the love

अध्यक्षपदी-महेश पळसकर;सचिवपदी शिवानंद स्वामी यांची निवड

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल जागृत देवस्थान लिंगायत समाजाचे दैवत श्री गुरुबुद्धिस्वामी मठ संस्थानच्या पाडवा यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, यात्रा महोत्सव समितीच्या नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २२ ते ३१ मार्च या कालावधीत यंदाचा पाडवा महोत्सव साजरा केला जाणार आहे.या निमित्ताने शिवनाम सप्ताह, शिव महापुराण कथा,श्रींचा पालखी सोहळा,खिरीचा भव्य महाप्रसाद धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री गुरुबुद्धीस्वामी पाडवा यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने मठ संस्थान येथे नुकतीच एक बैठक पार पडली.बैठकीत नुतन कार्यकारणी गठीत करण्यात आली.अध्यक्षपदी महेश पळसकर, उपाध्यक्षपदी हर्षल महाजन,सचिव शिवानंद स्वामी,कोषाध्यक्षपदी.सुनिल साबणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून,स्थायी समिती ,सांस्कृतिक समिती वार्षिक नियोजन समिती ,करसेवा समिती ,पत्रव्यवहार व प्रसिद्धीसोशल मिडिया व प्रसिद्धी ,पालखी नियोजन समिती ,चहापान नियोजन समिती ,लिंगायत स्मशानभूमी नियोजन समिती ,दासोह समीती स्थापन करुन यात्रा महोत्सव पार पाडण्यासाठी जबाबदार सोपवण्यात आली आहे. यावेळी शहर व तालुक्यातील लिंगायत समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You cannot copy content of this page