पूर्णेत रेल्वेकडून सोमवारी पत्रकारांकरीता मेडिया टूरचे आयोजन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

दमरेच्या पूर्णा जंक्शन स्थानकावरील रेल्वे रनिंग रूम येथे दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मिडिया टूरचे आयोजित करण्यात आली असून ,या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी अगत्याने उपस्थित रहावे असे आवाहन नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.या मेडीया टुर मध्ये पत्रकार बांधवांना रनिंग रूम पूर्णा येथे रनिंग स्टाफ (लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर) साठी उपलब्ध असलेल्या सुविधा, सुरक्षे विषयी घेतली जाणारी काळजी आणि रनिंग स्टाफ विषयी इतर बाबींची माहिती मीडिया प्रतिनिधींना माहिती देण्यासाठी पूर्णा रेल्वे स्थानक वरील क्रू लॉबी आणि स्थानका जवळील रनिंग रूममध्ये सोमवारी २१ रोजी ११ वा मीडिया टूर आयोजित करण्यात आली आहे याप्रसंगी राजेंद्र कुमार मीना, (अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक) नांदेड आणि श्री परम मित्र, (वरिष्ठ यांत्रिकी अभियंता), नांदेड विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित राहतील. आदरणीय संपादक / पत्रकार मित्रांना आणि वृत्त वाहिनी च्या प्रतिनिधींना विनंती आहे कि त्यांनी स्वतः किंवा प्रतिनिधी मार्फत या मिडिया टूर ला उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयाच्या वतीने जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page