पूर्णेत ४१ ग्रा.पं.च्या चाव्या जाणार सहचारिणींच्या हाती.!
७९ ग्रा.पं.च्या सरपंचपदाची आरक्षण सोडत संपन्न;दिग्गज गावपुढा-यांना हाकावा लागणार पडद्यामागुन गावगाडा
पूर्णा/प्रतिनिधी
२०२५ ते २०३० या कालावधीतील तालुक्यात पार पडणाऱ्या ग्रामपातळी वरील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षणाची सोडत उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती संतोषी देवकुळे यांच्या व शेकडो ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार ता.२२ एप्रिल रोजी पूर्णा तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आली असून ७९ ग्रामपंचायत पैकी ५० टक्के म्हणजे तब्बल ४१ ग्राम पंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी राखीव निघाले असून, गावपातळीवरील अनेक दिग्गजांच्या गावात महीला राज येणार आहे. यामुळे आता अनेक पुढा-यांना आता आपल्या सहचरणींच्या हातामध्ये सरपंच पदाची दोरी देऊन पडद्यामागून सरपंच पदाचा गाडा हाकावा लागणार असल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्त्वाचा घटक असलेला गाव पातळीवरील ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाची मानली जाते.राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक काळात राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहेत .यामध्ये पूर्णा तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतचा समावेश आहे.निवडणूक आयोगाच्या वतीने जनतेतून निवडून द्यावयाच्या सरपंचपद आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत . त्यानुसार मंगळवारी २२ एप्रिल रोजी येथिल तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गावपुढा-यांची बैठक बोलावण्यात आली होती. याबैठकीस उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) संतोषी देवकुळे, तहसीलदार माधवराव बोथीकर ,नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पंढरीनाथ शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेकडो आजी माजी लोकप्रतिनिधी सह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी निवडणूक विभागाचे व्यंकटेश जजरवार,अरविंद पंडित यांनी काम काम पाहिले.दरम्यान सरपंच पदाचे आरक्षण सुटल्यामुळे आता गाव पातळीवर आगामी काळात लवकरच निवडणूक आयोग निवडणुका घेणार असल्यामुळे आरक्षण लागू झाल्यानंतर निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याचे दिसून येत आहे.
१२ ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव
कातनेश्वर, खरबडा,आडगांव(ला), गोविंदपुर/मरसुळ,ईठलापूर, पिंपळगाव सारंगी/मिठापूर ही गांवे अनुसूचित जाती जमाती स्त्रियांसाठी राखीव करण्यात आली आहे.तर भाटेगांव,धनगर टाकळी,संदलापूर, कानडखेड, सोन्ना,दगडवाडी अनुसूचित जाती साठी राखीव असणार आहे.
२१ गांवे नामाप्र (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव
नामाप्र मध्ये प्रामुख्याने रेगांव,गौर, हिवरा(बु), माखणी,आलेगांव,सोनखेड, मुंबर,गोळेगांव, सुरवाडी,कमलापूर,पिंपरण महीलांसाठी राखीव असणार आहेत.तर नामाप्र पिंपळा लोखंडे, कानेगांव,नावकी,कावलगांव वाडी,फुकटगाव, पिंपळा भत्या, शिरकळस, एकरुखा,खडाळा, ममदापुर या गावांचा समावेश आहे.
४५ गावांत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठीआरक्षीत
जरी खुल्या प्रवर्गासाठी ४५ ग्रामपंचायतीचे आरक्षण सुटणार असले तरी यापैकी तब्बल २३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सूत्रे ही महिलांच्या हाती असणार आहेत.यामध्ये बानेगांव,दस्तापुर,पिंपळगाव(बा),आव्हई बडबडी,देगांव,एरंडेश्वर,हटकरवाडी,कलमुला, लोण(खु),महागांव,मजलापुर,सुहागन, आहेरवाडी,चांगेफळ,कंठेश्वर,लक्ष्मणनगर, पांगरा(ढो),वाई,बसला,धोत्रा,न-हापूर,ताडकळस या ग्रामपंचायतीच्या चाव्या आता महिलांच्या हाती असणार आहेत.तर आडगांव(सु), अजदापूर,देऊळगांव(दु),विमला,वझुर,धानोरा( का),कावलगांव,फुलकळस,पेनुर,पिंपळगाव (ली),रुंज,रुपला,खुजडा सुकी, खांबेगांव, माटेगांव,निळा,धानोरा(मो),सातेफळ,चुडावा,देवठाणा,कौडगाव या २२ ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत.
एकमेव कळगांव/कळगांव वाडी अनुसूचित जमाती एस.टी प्रवर्गासाठी राखीव राहील











