रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पूर्णा पोलीसांच्या ताब्यात

Spread the love

पूर्णा तालुक्यातील खुजडा-मिरखेल रस्त्यावर कारवाई:साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पूर्णा(प्रतिनिधी)

पूर्णा नदीपात्रातुन अवैधरित्या,उपसा केलेल्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका टिप्परला पूर्णा पोलीसांच्या पथकाने ताब्यात घेत शनिवारी २६ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविला आहे.सदरील घटना ही खुजडा-मिरखेल शिवारातील गणपूर पाटील जवळ घडली असून,पोलीसांनी यावेळी सुमारे ३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पूर्णा पोलिस ठाण्याचे पो.नि.विलास गोबाडे,फौजदार प्रकाश इंगोले, पोकाॅ.मंगेश जुकटे,पोकाॅ.शैलेश टाकरस,पोकाॅ.संदिप चौरे हे या २५ रोजी हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी खुजडा-मिरखेल रस्त्यावरुन फिरत असताना गणपूर पाटील जवळ तोंड पांढ-या रंगाचे डाला पांढ-या रंगाचे असलेली वाळुने भरलेले टिप्पर क्र एम.एच.१३/बीजे/१६३३ हे येत असतांना दिसुन आले तेव्हा पथकाने टिप्पर थांबविण्याचा प्रयत्न केला असता सदर टिप्पर चालक हा दुरूनच पथकास पाहुन टिप्पर जागीच थांबुन आंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला टिप्परची पहाणी केली असता टिप्पर मध्ये दोन ब्रास वाळु आढळून आली पोलीसांनी वाळूने भरलेला टिप्पर ३ लाख ५० हजार किमतीचा तसेच ६ हजार रुपये किंमतीची वाळू असा मुद्देमाल ताब्यात घेत पोकाॅ. शैलेश टाकरस यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक मालकांविरुद्ध गौण खनिज कायद्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पूर्णा पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page