जांभूळबेटाला IPS अधिकारी ऋषिकेश शिंदे यांची भेट
पूर्णा(प्रतिनिधी)
निसर्गाच्या सान्निध्यात नटलेला गोदावरी पात्रातील जांभूळ बेटानं अनेकांना भुरळं घातली आहे.अनेक पर्यटकांसह शालेय विद्यार्थी, निसर्गप्रेमी सह प्रशासनातील अधिकाऱ्यांची पावले या बेटाकडे वळू लागली आहेत.रविवारी ता.२७ रोजी परभणी जिल्ह्यातील IPS अधिकारी श्रृषिकेश शिंदे यांच्या सह उपविभागीय पोलिस अधिकारी टिपरसे, व डॉ समाधान पाटील यांनी भेट देऊन पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला.
पूर्णा-पालम तालुक्याच्या सिमेवर गोदामाईच्या कुषीत प्रवाहाच्या मधोमध निसर्गाच्या सानिध्यात वसलेले जांभूळ बेट निसर्गप्रेमी जनतेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे. बेटाचे आकर्षण आता अधिकारी वर्गाला होऊ लागले आहे.रविवारी गंगाखेड पोलीस ठाण्याचा पदभार असलेले आयपीएस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधीक्षक टिपरसे साहेब , पूर्णा उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ .समाधान पाटील साहेब व पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक थोरात साहेब हे देखील उपस्थित होते.त्यांनी बेटाची पाहणी करुन येथिल समितीच्या सदस्यांकडून सर्व माहिती घेतली पर्यटकांच्या सुरक्षेबाबत काही सुचना दिल्या.यावेळी जांभुळबेट संवर्धन समितीच्या वतीने त्यांचा कृषिभूषण कांतराव काका झरीकर यांच्या जीवनावरील ‘कांतायणग्रंथ’ देऊन स्वागत करण्यात आला.