नगरपालिकेने घरपट्टी -नळपट्टी वाढीव कर कमी करा-भाजपचे निवेदन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

नगरपालिकेने नविन कर आकारणीच्या नावाखाली घर पट्टी -नळपट्टीत अव्वाच्या सव्वा कर वाढवले असुन सदरील कर वाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.वाढवण्यात आलेली करवाढ रद्द करा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष राज ठाकर यांनी पालीका प्रशासनाकडे मंगळवारी एका निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

पूर्णा शहरात सध्या नगर पालिके मार्फत करवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयाच्या नोटीस नागरिकांना देण्यात येत आहे तरी या निर्णयाच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे नागरिकांना नगरपालिकेमार्फत मिळणाऱ्या सोयी सुविधा सुरळीत मिळत नाही दहा ते पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नाही पाणीपुरवठा सुरळीत होत नसून सुद्धा पाणीपट्टीत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे शहरातील स्वच्छता योग्य प्रमाणात होत नाही नगरपालिकेच्या कुठल्याही शाळा नसताना शिक्षण कर लादला जातो नगरपालिकेने कुठलेही वृक्ष लावले नाहीत तरी पण वृक्ष कर लावला जातो नगरपालिका प्रशासनाने सोयी सुविधा वेळेवर मिळत नाहीत तरीपण घरपट्टी राक्षसी वाढ केली आहे पुर्णा नगर पालिके मार्फत नागरिकांना योग्य त्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे नगरपालिकेने केलेली कर वाढ लोकांना मान्य नाही तरी नगरपालिकेने ही वाढीव कर रद्द करावी अशी मागणी शहराध्यक्ष राज ठाकर यांची आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्याधिका- यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page