महसूल विभागाच्या माध्यस्तीने कंठेश्वर-ध.टाकळी शिवरस्ता मोकळा
पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर शिवारातील शेतकऱ्यांची अडचण दूर
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील कंठेश्वर शिवारातील कंठेश्वर-धनगर टाकळी शिवरस्ता पूर्णा महसूल विभागाच्या माध्यस्तीने मोकळा करण्यात आला असून, रस्ता मोकळा करण्याचे प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे.यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यापायी होत असलेली कोंडी आता दुर होणार असल्याने शेतकऱी वर्षातुन समाधान व्यक्त केले जात आहे.
वर्षानुवर्षे शेतक-यांचे असलेले आप आपसातील वाद, रस्त्यावर झालेले अतीक्रमण यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वादविवाद होत आहेत. मात्र अशा स्थितीतही महसूल विभाग ‘सस्ती अदालत’ तसेच बांधावर जाऊन योग्य ती मध्यस्थी करून वहीवाट मोकळी करुन देत आहेत.पूर्णा तालुक्यातील मौजे कंठेश्वर शिवारातून जाणाऱ्या एका शिवरस्त्यावर अतीक्रमण झाले होते.दरम्यान शेतकरी शेतकऱ्यांत वादही होत होते.येथिल महसूल विभागाचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी २१ रोजी नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे, मंडळ अधिकारी के.पी.शिंदे,तलाठी सुभाष राऊत, तलाठी बाहेकर, यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन मध्यस्थी करत कंठेश्वर-धनगरटाकळी ७०० मी लांब व २६ फुट रुंदीचा शिवरस्त्याची वाट मोकळी करून दिली आहे.यावेळी पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच यांच्या सह हरिभाऊ कदम, नरहरी कदम, दत्ता जाधव जमादार राठोड आदींची उपस्थिती होती. दरम्यान वादग्रस्त ठरलेल्या शिवरस्त्यावर खोदकाम करुन शिवरस्त्याची वाट मोकळी करून दिली आहे.