पिंपळगाव(बा)येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे ता.२ जुन सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जयंतीनिमित्त व्याख्यान, शोभायात्रा, दिंडी, महाप्रसाद आदींचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समाजबांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव (बा) येथे आयोजित राजमाता आहील्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते खा.संजय जाधव, यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणीकराव बनसोडे प्रमुख उपस्थितीत आ.डाॅ. रत्नाकर गुट्टे जिल्हा प्रमुख विशाल कदम,पांडुरंग बनसोडे, पै.मारोतराव बनसोडे,सुरेशभाऊ भुमरे,संतोष मुरकुटे, बबन (आण्णा) मुळे,अक्षय आटोळे,सौ.कमलाबाई रणवीर.पै.अशोक धरणे,जलील पटेल, नारायण पिसाळ, विठ्ठलराव रबदडे, दादाराव पंडित, बापुराव घाटोळ,प्रताप कदम,विश्वनाथ होळकर, प्रताप बखाल, बाजीराव बनसोडे, धर्मराज चव्हाण यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी सुरेशभाऊ भुमरे (भाजपा युवा मोर्धा प्रदेश उपाध्यक्ष) अक्षय आटोळे (धनगर समाज युवा नेता जालना) हे प्रमुख व्याख्यान देणार आहेत.

सोमवार दि.२ जुन सकाळी १० ते १ व्याख्यानाचा कार्यक्रम, ०१ ते ३ भोजन, ३ ते ६ मिरवणुक, ७ ते १० दिंड्यांचा कार्यक्रम पार पडणार आहे.तरी कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष मुक्ती राम बनसोडे,उपाध्यक्ष नवनाथ बनसोड, दिपक बनसोडे, सुदाम बनसोडे,लक्ष्मण बनसोडे,बळीराम बनसोडे,गणेश बनसोडे, शाम सोपान बनसोडे,बंडु अप्पा बनसोडे ,आनंद (बंडु) बनसोडे,जगन्नाथ रेनगडे,गोपाळ मात्रे, मंगेश बनसोडे,अनिल मलांडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page