मोफत हृदय शस्त्रक्रियांचा शिबीराचा लाभ घ्यावा-विशाल कदम
मुंबई/प्रतिनिधी
शिवसेना नेते एकनाथ भाईंच्या षष्ठीचे औचित्य साधून सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे व डॉ.अमोल गिते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांसाठी वर्षभर मोफत हृदय शस्त्रक्रियांचा सुत्य उपक्रम राबवत आहे.या शिबीराचा गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी केले आहे.
प्रसंगी उद्घाटक म्हणून शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख विशाल भाऊ कदम हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला मा.दिलीप बारटक्के (नगरसेवक, ठाणे मनपा),मा.ना.एकनाथ भोईर (नगरसेवक,ठाणे मनपा),सौ. विमलताई भोईर (नगरसेविका,ठाणे मनपा)सौ.आशा डोंगरे (नगरसेविका, ठाणे मनपा),शाखाप्रमुख निखिल बुरजडे (टेंभी नाका) आणि डॉ.हितेश पाटील यांची उपस्थिती होती.या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात लहान मुलांसाठी आयोजित हृदय शस्त्रक्रिया शिबिरात ११५ बालरुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. ही अत्यंत उल्लेखनीय आणि संवेदनशील बाब असून,या उपक्रमामुळे अनेक निरागस जीवांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मा. मंगेश चिवटे आणि डॉ.अमोल गिते यांचे या उपक्रमातील योगदान अमूल्य आहे. आज यशस्वी उपचारानंतर ११५ बालकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.