पूर्णा पालीका कर्मचारी नईम पठाण यांचा सेवापुर्ती सोहळा

Spread the love

पूर्णा/प्रतिनिधी

येथिल पालीकेतील कर्मचारी नईम पठाण हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन सोमवारी ता.२ रोजी सेवानिवृत्त झाले असून,त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन युवानेते मनोज भाऊ उबाळे यांनी केले होते.यावेळी त्यांचा पुष्पहार शाल श्रीफळ घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.

पूर्णा पालीकेचे कर्मचारी नईम पठाण हे पालीकेतील जनसामान्यांना आपले वाटणारे कर्मचारी , त्यांनी पालीकेच्या विश्रांती गृह शिपाई पदापासून पालीकेतील सेवेला सुरुवात केली,पुढे स्वच्छता, पाणीपुरवठा, कार्यालयीन अधीक्षक पदापर्यंत अविरत ४० वर्षीय सेवा बजावली आहे.सर्वांना हवे हवेसे वाटणारे पठाण हे सोमवारी वयाच्या ६० व्या वर्षी पालीकेच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.यावेळी त्यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन मनोज उबाळे यांनी केले होते.यावेळी मा. नगरसेवक फारूक सौदागर,कॅप्टन अमजद,बाबा पठाण, उत्तम कांबळे,मोहन एंगडे,सोनाजी खिल्लारे, आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You cannot copy content of this page