भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर..

Spread the love

पुर्णा ता.६ जुन(प्रतिनीधी)

मुंबईत १० जुन रोजी होणार पुरस्काराचे वितरण; सामाजिक न्याय विभागाची माहिती

अ.भा.भिक्खु महासंघाचे कार्याध्यक्ष तथा पुर्णा बुद्ध विहाराचे भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून दिल्या जाणाऱ्या “समाजभूषण” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाकडून मिळाली आहे.हा पुरस्कार ता.१० जुन रोजी मुंबईत एका कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

पूर्णा बुद्ध विहाराचे भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो हे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत असतात.धर्मप्रसाराचे कार्यकरत असताना त्यांची यापुर्वी अ.भा.भिक्खु महासंघाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून,मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्मपरिषदा, सामुहिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीरासह कोरोना काळामध्ये त्यांनी उपेक्षितांना केलेली मदत उल्लेखनीय आहे.सामाजिक न्याय विभागाकडून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून, विभागाकडून दिल्या जाणाऱ्या “समाजभूषण” पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबईत ता.१० रोजी सामाजिक न्याय विभागाच्या एका कार्यक्रमात डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.भदंत डाॅ.उपगुप्त महाथेरो यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती समजताच भंते पय्यावंश,भंते पय्यासार, खा.संजय ऊर्फ बंडू जाधव,प्रकाशदादा कांबळे, सिद्धार्थ हत्तीहंबीरे,शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, मा.नगराध्यक्ष संतोष एकलारे,जाकीर कुरेशी, हाजी कुरेशी, संजय सारणीकर,गौतम भराडे,रवि कांबळे, उत्तम भैय्या खंदारे, दादाराव पंडित, मनोज उबाळे, राजु नारायणकर, अनिल कांबळे,रौफ कुरेशी ,अँड हर्षवर्धन गायकवाड, अनिल खर्गखराटे यांच्या सह श्याम कदम, गजानन हिवरे,रवि गायकवाड,प्रविण गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.महासमाचार परिवार भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांचे विशेष अभिनंदन करत आहे.

You cannot copy content of this page