बौद्धिक चाचणी परीक्षेत ९० जणांनी घेतला सहभाग

Spread the love

पुर्णेतील बुद्ध विहारात जेष्ठ पौर्णीमेनिमीत्त बौद्धिक चाचणी, व प्रश्नमंजुषा परिक्षेचे आयोजन ..

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल बुद्ध विहार समीतीच्या वतीने बुद्ध  विहार येथे  जेष्ठ पौर्णीमेनिमीत्त रविवार ता.८ रोजी बौद्धिक चाचणी व प्रश्नमंजुषा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परिक्षेत ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

        पूर्णेतील बुद्ध विहारात जेष्ठ पौर्णिमेचे औचित्य साधून अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,भंते पयावंश त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बौद्धिक चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.यापरिक्षेत शहरातील ग्रामीण भागातील व विविध जाती धर्मातील ९० विद्यार्थी  सहभागी झाले होते. बुद्ध विहार समिती पूर्णा या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अझाल्याबद्दल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ.उपगुप्त महाथेरो यांना सत्कार करण्यात आला.

यावेळी  बोलताना भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो म्हणाले की ,बाल वयात धम्माचे संस्कार व्हावेत.धम्मा मधील शील सदाचार प्रज्ञा करुणेची शिकवण विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी या व्यापक दृष्टिकोनातून या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बुद्ध विहार समीतीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page