रस्ता बांधकामाच्या चौकशीसाठी सा.बां समोर उपोषण
सुहागन येथिल खुशाल भोसले यांचं उपोषण सुरू
पूर्णा(प्रतिनिधी)
प्रतिमा क्र.११ पुर्णा-हयातनगर-शिरडशहापूर मार्गावर सुरू असलेले प्रजिमा क्र-११ रस्ता बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कामाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी यासाठी सुहागन येथिल सामाजिक कार्यकर्ते खुशाल भोसले हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
कोट्यावधी रुपयांची लागत लाऊन हयातनगर रस्स्याचे काम सा. बां.विभागाने हाती घेतले आहे.संबंधित कामाचे कंत्राटदार विभागातने ठरवून दिलेल्या प्रचलीत नियमानुसार सदरील काम होत नसुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून सदरील काम होत आहे.काही दिवसांपुर्वी संबंधित कामांबाबत सुहागन येथील खुशाल भोसले यांनी सा.बां विभागाकडे तक्रार केली होती.दरम्यान कामाचा दर्जा सुधारला नसल्याने तसेच चौकशी झाली नसल्याने भोसले यांनी सोमवारी ता.९ जुन पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.यावेळी त्यांनी सा.बां विभागाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.प्रसंगी त्यांना पाठींबा देण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष अनिल बुचाले सह कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.