सेवानिवृत्त सपोउपनि भगवानराव जाधव बामणीकर यांचं निधन
पूर्णा(प्रतिनिधी)
सेवानिवृत्त सपोउपनि भगवानराव जाधव बामणीकर ह.मु.छत्रपती संभाजीनगर यांचं ता.२५ रोजी पहाटे ५;४५ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले असून मृत्युसमयी त्यांचं वय ७५ वर्षे होतं.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे कर्तव्यदक्ष पोलिस म्हणून ते सुपरिचित होते .पूर्णा पोलीस ठाण्यात त्यांनी जमादार म्हणून सुमारे ५ वर्षे सेवा बजावली आहे.त्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर येथील सिडको एन-६ येथिल स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी, सुष्ना,जावंई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.