मोहरम निमित्त ईश्यु पठाण मित्र मंडळाच्या वतीने सरबत वाटप

Spread the love

पूर्णा ता.७(प्रतिनिधी)

मुस्लिम बांधवांच्या मोहरम सणानिमित्त पूर्णेतील सामाजिक कार्यकर्ते ईश्यु पठाण मित्र मंडळाच्या वतीने ता.६ रोजी सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          पूर्णा शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने  मोहरम सणानिमित्त दरवर्षी हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी सरबत वाटप करण्यात येते.यंदाही येथिल रविवारी ता.७ रोजी ईश्यु पठाण मित्र मंडळाच्या वतीने सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी रा.काॅचे शहर अध्यक्ष प्रताप भैय्या कदम  आयोजक युवा नेते ईश्यु पठाण, गजानन हिवरे अक्रम पठाण,रवि गायकवाड़, गोविंद  गाडवे, कृष्णा कदम,भानूदास वाळवंटे, शेख अनिस बाबुमीया, बबलू पठाण शेख जफर पाशा आदींची उपस्थिती होती. यावेळी  हिंदू मुस्लिम एकोपा चे दर्शन दिसून आले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सरबतचा आस्वाद घेतला.

You cannot copy content of this page