दोन उन्माद वानरांचा उच्छाद;४ जणांना घेतला चावा
पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील घटना;जखमीवर उपचार सुरू
पूर्णा ता.९(प्रतिनिधी)
मागील ५ ते ६ दिवसांपासून तालुक्यातील मौजे कात्नेश्वर येथे दोन उपद्रवी वानरांनेशी अक्षरशःधुमाकूळ घालत ४ ग्रामस्थांना चावा घेऊन गंभीर जखमी केले असल्याची माहिती आहे.वानरांच्या या उच्छादामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली असून,सदरील वानरांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.
पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे मागील आठवड्या भरांपासुन दोन उपद्रवी वानरांनी उच्छाद मांडला आहे.सदरील वानरं धुमाकूळ घालत दिसेल त्याला पकडून चावा घेत आहेत.वेळी अवेळी वानंरं ग्रामस्थांच्या घरात प्रवेश करुन हल्ला करत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत, अक्षरशः रात्र जागून काढत आहेत. या वानरांनी तब्बल २० ते २५ नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती आहे.या हल्ल्यात ४ जणं जखमी झाले असून,.शांताबाई एकनाथराव तोरसे वय६५),अनंत दत्तराव चापके(वय ६५), बापूराव चापके(वय ५५),बाळू चांदोजी चांदणे(वय ४५) सर्व रा.कात्नेश्रर ता.पूर्णा अशी जखमींची नावे आहेत . यातील दोन जखमीवर जिल्हा रुग्णालयात तर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असल्याचे समजते, ग्रामस्थांनी सदरील वानरांचा पिटाळून लावण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले परंतु, उन्माद वानरं हाती लागली नाहीत.वनविभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या प्रकाराबाबत वनविभागास माहिती देण्यात आली असल्याचे कात्नेश्वर सरपंच प्रदिप चापके, पोलीस ज्ञानोबा काटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.











