Hitech Residency School;संस्थाचालक चव्हाण दाम्पत्याची न्यायालयीन कोठडी रवानगी

Spread the love

झिरोफाटा (पूर्णा)हायटेक निवासी शाळेतील हभपं.हेंडगें महाराज खुन प्रकरण;मा.पूर्णा न्यायालयाचा निर्णय

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी)

परभणी जिल्ह्यातील पूर्णेतील झिरोफाटा येथील (Hitech Residency School)हायटेक निवासी शाळेत घडलेल्या हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरणांत पूर्णा पोलिसांच्या कोठडीत असलेले शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांची मा.पूर्णा न्यायालयाने (ता.२७) रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

       हायटेक रेसिडेन्सी स्कूल झिरोफाटा ता‌.पूर्णा येथील शाळेच्या संस्थाचालक चव्हाण दाम्पत्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत परभणी तालुक्यातील उखळद येथिल हभप.जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांचा मृत्यू झाला होता.ते आपल्या मुलीची टिसी आणण्यासाठी शाळेत गेले होते. याच कारणामुळे त्यांना मारहाण झाली होती.याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात (ता.१०) चव्हाण दाम्पत्यां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर मागावर असलेल्या पोलीस पथकाने तब्बल १२ ते १३ दिवसांनी जोडप्याला पुणे सिंहगड परिसरातून ताब्यात घेऊन गजाआड केले होते.दरम्यान आरोपींच्या अटकेसाठी मोर्चासह, विधानसभेत देखील या घटनेचे पडसाद उमटले होते.मागील ७ दिवसां पासून पूर्णा पोलीसांच्या कोठडीत असलेले प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांना आज सोमवारी ता.२७ रोजी मा.पूर्णा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.मा.न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील हे करत आहेत.

You cannot copy content of this page