चुडावा-मरसुळ बायपास विरुद्ध मोठा लढा उभारु;खा.संजय जाधव

Spread the love

रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार;बायपास विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली घेतली ग्वाही

पूर्णा ता.४(प्रतिनिधी)चुडावा-मरसुळ रेल्वे बायपास मार्ग पूर्णेलाच नव्हे तर परभणी जिल्ह्याला ‘बायपास’ करणारा आहे.ह्या प्रस्तावित बायपासविरुद्ध मोठा लढा उभा करु,असा दृढ निश्चय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खा. संजय उर्फ बंडू जाधव यांनी पूर्णा येथील शिष्टमंडळाशी बोलताना व्यक्त केला.          पूर्णेकरांचे बायपास विरोधी कृती समितीच्या एका शिष्टमंडळाने रविवारी (ता.३)रोजी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांची भेट घेतली.यावेळी शेख अहेमदभाई,जगदीश जोगदंड, डॉ.हरिभाऊ पाटील, लक्ष्मीकांत शिंदे, ॲड.एम ए सईद,प्रदीप ननवरे, सुनील डुब्बेवार आदींनी प्रस्तावित रेल्वे बायपास प्रश्नाबाबतची समस्या , नुकसान आदीं बाबींची माहिती खा. जाधव यांना दिली.शेतकरी व प्रवाशांची यामुळे कशी कोंडी होणार आहे हे स्पष्ट केले. यावेळी शिष्टमंडळास खा. जाधव यांनी सांगितले की, यापुर्वीही मी पुर्णा रेल्वे प्रश्नी जातीने लक्ष घालून लढा लढलो आहे.यापुर्वी रेल्वे प्रश्नी मोठं जन आंदोलन देखील केलं आहे.त्या आंदोलनाच्या केसेस आजही सुरू आहेत.आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी पुर्णा रेल्वेचा विकास न करता अधोगती सुरू केली आहे.या प्रस्तावित बायपास बाबतचा प्रश्न मी संसदेत शून्य प्रहरात उपस्थित करणार आहे.शिवाय प्रश्नासह अन्य रेल्वे समस्यां साठीही रेल्वेमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागण्यासाठी पत्र पाठवले आहे, रेल्वे मंत्री याबाबत काय निर्णय घेतात यानंतर आपण पुढील भुमिका घेऊ वेळप्रसंगी बायपासविरुद्ध मोठा लढा उभा करु असे सुतोवाच खा.जाधव यांनी शिष्टमंडळाला बोलताना केले.दरम्यान मागण्यांचे एक निवेदन शिष्ट मंडळाच्यावतीने देण्यात आले.

You cannot copy content of this page