वंचित बहुजन आघाडीचे आज पुर्णा बंदचे आवाहन..

Spread the love

जंतरमंतरवरील आंदोलनर्कत्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ निर्णय;बंदला काँग्रेसचाही पाठिंबा

पूर्णा,ता.२२| प्रतिनिधी :

नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईची चौकशी करावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने पूर्णा शाखेच्या वतीने बंदचे आवाहन केले आहे. या बंदला काँग्रेसनेही जाहीर पाठिंबा दिला असून याप्रकरणी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, काँग्रेसचे शहराध्यक्ष सरान बागवान, रवी वाघमारे, सुनील मगरे, श्यामसुंदर काळे, अजय काळे, तुषार भारती, राजू गायकवाड सहआदींच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.दरम्यान, २३ जुलै रोजी पूर्णा शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसनेही केले आहे.

You cannot copy content of this page