स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व फळवाटप…

Spread the love

पूर्णा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सामाजिक उपक्रम; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पूर्णा, दि. २२ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पूर्णेत तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तर ग्रामीण रुग्णालय, पूर्णा येथे रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्णा तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई, जिल्हा परिषद सदस्य श्रीधरराव पारवे, पूर्णा कारखान्याचे संचालक गजाननराव धवन, अच्युतराव पारवे, रघुनाथ डाखोरे, शाहू भुसारे, पंढरीनाथ ढोणे, बालाजी भोसले, भीमराव डोईफोडे, आनंद जोगदंड, प्रभाकर पिडगे, विठ्ठलराव कदम, चंद्रकांत कराळे, डी. एन. किरगे, देविदास पारवे, भगवान खंदारे, दासराव भोरे, संतोष सातपुते, संजय खल्लाळ, बापूराव मोरे, भगवान देसाई, नामदेव देसाई, बालाजी काळबांडे, संभाजी भोसले, रमेश सावराते, मनोहर पवार, नारायण जाधव यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली

You cannot copy content of this page