Purna Crimeमुलाला का मारले.?याचा जाबविचारणा-या महीलेचा विनयभंग
पुर्णा तालुक्यातील कावलगावांतील घटना;चुडावा पोलीसांत ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
पुर्णा ता.५(प्रतिनिधी)अल्पवयीन असलेल्या मुलाला कुलूपाने व लाकडी खो-याचे दांड्याने मारहाण केल्या नंतर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलाच्या (४२) वर्षीय आईला देखील थापड बुक्यांनी मारहाण करत, अश्लील भाषेत शिवीगाळ करत, तिच्या अंगावरील वस्त्र फाडून तिचा विनयभंग केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथे घडली आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध चुडवा पोलीस ठाण्यात(Chudawa Police Station)गुरनं २००/२०२५ भा.न्या.सं कलम ७४ सह (molestation)विविध कलमांखाली सोमवारी (ता.४) ऑगस्ट रोजी सायं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्णा तालुक्यातील मौजे कावलगांव येथे घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती आपल्या मुला व मुली सोबत कावलगांव येथे राहते (ता.१) रोजी रात्री ८;३० वाजेच्या सुमारास तीचा मुलगा हा आपल्या चुलत्यास दुचाकीवर सोबत घेऊन बाजारातुन फिल्टरचे पाणी आणण्यासाठी घरुन निघाला होता. जाताना त्याच्या चुलत्याने पानटपरीवर सुपारी खाण्यासाठी दुचाकी थांबवली होती.दरम्यान गावातील गिरीष निवृत्ती देशमुख नामक ईसमाने सदरील तरुणास दुचाकी जवळ येऊन शिवीगाळ करत पिडीतेच्या मुलाला त्याचे हातातील कुलूपाने व खो-याचे दांड्याने पाठीत, कोपरावर,मांडीवर मारहाण केली. त्याच्या चुलत्याने भांडण सोडवा सोडवी केली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पिडीत महिला संबंधीतांना जाब विचारण्या साठी गेली दरम्यान तेथे गिरीष देशमुख याचे सोबत उभे असलेले निवृत्ती देशमुख, अनिल पिसाळ,गंगाधर पिसाळ,गोरखनाथ पिसाळ यांनी सर्वांनी घोळका करून परत तीच्या अल्पवयीन मुलास लाथा,बुक्याने,चापटाने मारण्यास सुरुवात केली.तीने अडवा अडव करताच तीस थापड बुक्याने मारहाण करत निवृत्ती देशमुख यांने अंगवस्र जामुन बुजुन फाडले व अश्लील भाषेत शिव्या घालत तुला व तुझ्या मुलाला गायब करुत, कापून फेकून देवु धमकी दिली.याप्रकारानंतर पिडीतेने रुग्णालयात उपचार घेऊन (ता.४) रोजी चुडावा पोलीसांत एक तक्रार दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या वरुन वरील ५ जणांविरुद्ध विनयभंग व विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास फौजदार अरुण मुखेडकर हे करत आहेत.











