Parbhaniप्रहारचे कार्यकर्ते आक्रमक महसुलमंत्री बावनकुळेंच्या प्रतिमेचे केलं दहन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला नौटंकी म्हटल्याचे महसुलमंत्र्यांचे वक्तव्य;प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन
परभणी,ता.५(प्रतिनिधी)‘शेतकरी कर्जमाफी आंदोलन आणि शेतकर्यांची विविध आंदोलने नौटंकी आहेत’, असे वक्तव्य (State Revenue Minister Chandrashekhar Bawankule)महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध करत परभणी येथे(Prehar Janshakti Party)प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महसुल मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि प्रतिमा दहन करून मंगळवारी (या.५) रोजी निषेध आंदोलन करण्यात आले.
माजी मंत्री बच्चु कडू यांनी राज्यभर सुरू केलेल्या कर्जमाफी व हमीभाव आंदोलन हे दोन्ही आंदोलने शेतकर्यांच्या हिताची आणि शेतकर्यांच्या हक्काचे आहेत. निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा व हमीभाव आश्वासन देणार्या भारतीय जनता पार्टी सरकार त्यांनीच दिलेली आश्वासन विसरले त्याच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठीच शेतकरी राज्यभर आंदोलन करीत आहेत या आंदोलनाला नौटंकी म्हणून शेतकर्यांच्या भावनांवर मीठ चोळणार्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाट असून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी येथील उपोषण मैदानात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन करून आंदोलन केले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी बावनकुळे व सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी या वेळी केली.आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, दिव्यांग आघाडी जिल्हाप्रमुख केशव जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, ऑटो आघाडी शहर प्रमुख शंकर दामोदर, सरचिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख सुरेश आगलावे,हेमराज गरूड, राहुल शिवभगत, रामराज कांगणे, नारायण धुमाळ, रमेश जोंधळे, गोपीनाथ जोंधळे इत्यादी उपस्थित होते. दरम्यान राज्यभरात आजपर्यंत झालेल्या सहा लाख शेतकर्यांच्या आत्महत्या व रस्त्यावर दिसणारा शेतकर्यांचा आक्रोश ही नौटंकी आहे का असा संतप्त सवाल यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी उपस्थित केला.












