Purna बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी प्लेसमेंट रिक्रूटमेंट ड्राईवचे आयोजन
श्रीगुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात १९ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन; प्राचार्य डॉ के.राजकुमार यांची माहिती
पूर्णा ता.११(प्रतिनिधी). येथिल श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयतील(Purna Shri.Guru BuddhiSwami Mahavidyala Purna)करीयर गाईडन्स व प्लेसमेंट सेलच्या वतीने मंगळवार ता.१९ आॅगस्ट रोजी ५ व्या प्लेसमेंट रिक्रूटमेंट ड्राईवचे आयोजन करण्यात आले असुन, ज्या विद्यार्थ्यांनी २०२० ते , २०२५ साला दरम्यान १०,१२ वी तसेच पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.त्यांनी यावेळी राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी केले आहे.
पुर्णा येथिल श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात(placement Recruit ment Drive)प्लेसमेंट रिक्रूटमेंट ड्राईव अंतर्गत बँकिंग क्षेत्रातील नोकरीसाठी स्पर्धापरीक्षा संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. तसेच "करीयर कट्टा" अंतर्गत उद्योजकता व यु. पी. एस. सी. परीक्षा संदर्भात मार्गदराहण करण्यात येते. स्पर्धापरीक्षा संबंधी भिंती पत्रक चालविण्यात येते. युवा परिवर्तन मार्फत रोजगाराभिमुख स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम चालविण्यात येतात.महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हि महत्वाचे आहे. जे विद्यार्थी महाविद्यालयाच्या तृतीय/शेवटच्या वर्षाला शिकत आहेत त्यांना विविध कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी बँकांना कंपन्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ म्हणून निवडण्यासाठी महाविद्यालयामध्ये कॅम्पस प्लेसमेंट कॅम्पचे प्लेसमेंट रिक्रुटमेंट ड्राईवचे आयोजन केले जाते. त्यासाठी विविध चाचण्यांमधून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. यापुर्वीही महाविद्यालयात चार वेळेस प्लेस मेंट कॅम्प मधून सुमारे ७०-८० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या अनुषंगाने श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालय व ग्लोबल आऊट सोर्सिंग व ट्रेनिंग सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने कमरसिअल बँकस (ICICI Bank, Bank, RBL Bank, Kotak Bank, Yes Bank and Bandhan Bank) बँकेमधील बँक ऑफिसर्स या पदांसाठी कॅम्पस प्लेसमेंट रिक्रुटमेंट ड्राईवचे आयोजन मंगळवारी ता.१९ ऑगस्ट रोजी स. १०.३० वाजता करण्यात आले आहे.तरी पात्र विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार व करीयर गाईडन्स व प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. जितेंद्र पुल्ले यांनी केले आहे.











