स्वातंत्र्य सैनिक सुर्यभान पवार महाविद्यालयांत स्वतंत्र दिन साजरा

Spread the love

पूर्णा ता.१५( प्रतिनिधी)  येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात देशाच्या  स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या संविधान भित्तिपत्रकाचे  उद्घाटन करण्यात आले.

    यावेळी डॉ.आदीनाथ इंगोले,डॉ. सुरेखा भोसले, डॉ.विजय भोपाळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील मगरे, तुषार गायकवाड, कुंदन ठाकूर आदींची उपस्थिती होती.यावेळी,प्रा. सुजाता घन यांनी राष्ट्रगीत गायले.यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या भितीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. संपादक मंडळातील अविनाश नागरे, कुणाल सोनवणे, विनोद पाटील, नागनाथ वैद्य आदी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार व प्रमुख  मार्गदर्शक डॉ. अदिनाथ इंगोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.प्रसंगी प्रोफेसर डॉ. संजय कसाब, प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांच्या सह महाविद्यालया तील प्राध्यापक, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page