Tadkalas Police News;लिमला शिवारात अवैध वाळुचा टिप्पर पकडला
पूर्णा ता.१७(प्रतिनिधी) पुर्णा तालुक्यातील लिमला पाटी परिसरात अवैध रेती वाहतुक करणार्या वाहनावर ताडकळस पोलिसांनी कारवाई करत अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेले टिप्पर जप्त करत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लिमला पाटी रस्ता परिसरात आरोपी अरबाज खान अजहर खान पठाण राहणार लोहगाव वाहन क्र.एमएच04 ईएल 7338 या टिप्पर मध्ये विना परवाना अवैध चोरटी वाहतुक करतांना शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास मिळून आला. आरोपीच्या ताब्यातून 7 लाख रूपये किंमतीच्या टिप्पर वाहनासह वाहनातील अंदाजे अडीच ब्रास रेती जप्त करण्यात आली. कारवाईत एकून 7 लाख 25 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलिस अंमलदार तुकाराम आयनाले यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गणेश लोंढे हे करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार गजानन मोरे, संदिप साळवे, राम सोळंके, तुकाराम आयनाले यांच्या पथकाने केली.











