पुर्णा ता.१८(प्रतिनिधी)Yeldari dam water dischargeपूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून (ता.जिंतूर जि.परभणी) आज सकाळी ७;४५ वाजता दहा दरवाजे ०.५ मिटरने उघडून पूर्णा नदी पात्रात २१ हजार १००.४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून तसेच खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने आज सकाळी पावणे आठ वाजता येलदरी धरणाचे प्रथम६ ,नंतर एकूण १० गेट ०.५मी. ने उघडण्यात आले आहेत. त्याद्वारे २१ हजार हुन अधिक क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.तसेच येलदरी जलविद्युत केंद्राच्या गेटद्वारेही २ हजार ७००क्यूसेस पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे.धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल,पुर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार असल्याने पुर्णा नदीला पूर येणार आहे. नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन पुर्णा पाटबंधारे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी केले आहे.
रविवारी सिद्धेश्वर जलाशयातुनही पाणी सोडले
हिंगोलीसह औंढा तालुक्यासह सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने १७ आँगस्ट रविवारी सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असुन धरणात पाण्याची आवक पाहता धरणाचे ८ दरवाजे उघडून पूर्णा नदी पात्रात १३ हजार ३७ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे (Siddheshwar Dam) पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.