Parbhani जिल्ह्यात २७ ऑगस्ट पासून कलम ३३ लागु;जिल्हाधिकारी गावडे यांचे आदेश

Spread the love

परभणी या.१९(प्रतिनिधी) श्री गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तोडांवर आला आहे.गणेश उस्तवासह जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६सप्टेंबर या कालावधीत तसेच ५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे. या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कलम ३३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सदर आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व ठाणे अंमलदार व किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीत खालील बाबतीत आदेश देण्याचे सूचित केले आहे.

या दरम्यान रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे किंवा त्यांची वर्तणुक किंवा वागणुक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत, असे मार्ग व अशा वेळा विहीत करणे. सर्व मिरवणुकींच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या सर्व जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होऊ न देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये, जत्रा, देवळे आणि इतर सर्व सार्वजनीक स्थळी सुव्यवस्था राखणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ, सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे, गाणी गाण्याचे किंवा ढोल, ताशे व इतर वाद्य वाजविण्याचे आणि शिंगे व इतर कर्कश वाद्य वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. तसेच कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागे जवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

सक्षम प्राधिकाऱ्याने या अधिनियमाची कलमे ३३,३५,३७,ते४०,४२,४३,४५ 33, 35, 37 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्ठी देणारे योग्य आदेश देणे. सदर आदेशात नमूद करण्यात आले की, कोणत्याही इसमाने अगर सदर आदेश लागू असेपर्यंत परभणी जिल्ह्यात जाहीरसभा, पदयात्रा इत्यादी कार्यक्रमासंबंधी ठाणे प्रभारी अधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून तारीख, वेळ, सभेची जागा, मिरवणुकीचा मार्ग त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा इत्यादी बाबत लेखी परवानगी घेतल्याशिवाय आयोजित करु नये. तसेच संबंधीत पोलीस अधिकारी यांचे आदेशाचे पालन करावे. जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा, मोर्चा यात ज्या घोषणेत शांतता व सुव्यस्थेस बाधा येऊ शकेल अशा घोषणा देऊ नयेत. हे आदेश लग्नाच्या वरात, प्रेतयात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू नाहीत. कोणी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास ती व्यक्ती मुंबई पोलीस कायदा कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

You cannot copy content of this page