डॉ.नरेंद्र दाभोळकरांचा स्मृतीदिन साजरा

Spread the love

पूर्णा ता.२०(प्रतिनिधी)येथिल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने समितीचे संस्थापक स्व. डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनाच्या निमिताने (ता.२०) रोजी अभिवादन करण्यात आले.

पुर्णा शहरातील आनंदनगरातील एका कोचिंग क्लासेस येथे बुधवारी अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी प्रा.राजेश पर्लेकर,प्रा.नसीर शेख, अमृत कऱ्हाळे,अमन जोंधळे,अजय खंदारे पवन असोरे सर,शेख अय्युब, गंगाधर प्रजापती यांच्या सह विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.यावेळी अभिवादन गीत सादरीकरण करण्यात आले उपस्थितांच्या हस्ते स्व. दाभोळकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.राजेश पर्लेकर,यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. नसीर शेख आभार अमन जोंधळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page