Purnaपोलीसांकडून गुरुवारी अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन
पूर्णा ता.२०(प्रतिनिधी) अमली पदार्थ निर्मूलनासाठी सुरू असलेल्या जनजागृती अभियानाचा भाग म्हणूनPurna Police Station News परभणी जिल्हा पोलीस दलाच्या पुर्णा पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवारी सकाळी ७ वाजता शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असुन, यावेळी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील व पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी केले आहे.

जनजागृती सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी SP RavindraSingh Pardeshi हे पोलीस ठाणे पुर्णा येथे करणार आहेत.यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ यांची प्रमुख असणार आहे.या रॅलीत पोलीस अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित रहाणार आहेत.“नशामुक्त समाज” घडवण्यासाठी अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे संदेश देत ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे.तरी शहरातील शालेय-कॉलेज विद्यार्थी तसेच नागरिकांनी देखील या जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन पुर्णा पोलीसांच्या वतीने डॉ.समाधान पाटील, विलास गोबाडे यांनी केले आहे.












